अक्षरज्ञान नसतानाही जीवनातील सुखदुःखे समर्थपणे रेखाटणारी बहिनाई कालातीत – प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे
फैजपूर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
ग्रामीण भागातील सामान्य जीवन जगत असताना स्वतःमधील प्रतिभाशाली गुणसंपन्नतेमुळे आयुष्यातील सुखदुःखे, विविध प्रसंग, जीवनाची तत्त्वज्ञान, पशुपक्षी, प्राणी, झाडे, वेली, फुले यांच्यासहित निसर्गावर शब्द सामर्थ्याने अमिट छाप सोडून अवघ्या राष्ट्राला दखल घ्यायला भाग पाडणारी प्रतिभासंपन्न कवयित्री म्हणजेच बहिणाबाई चौधरी होय. सुप्रसिद्ध साहित्यिक प्र. के. अत्रे यांच्या शब्दातील *साहित्य क्षेत्रातला खजिना* व आपल्या विद्यापीठाला नामकरण लाभलेल्या कवयित्री बहिनाई यांचे साहित्य प्रत्येकाने अभ्यासले पाहिजे असे गौरवोद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुळदे यांनी व्यक्त केले.
ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण व उत्सव समितीच्या वतीने आयोजित कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीच्या औचित्याने आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. सर्वप्रथम खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे चेअरमन प्रा डॉ दीपक सूर्यवंशी यांनी केले. त्यात त्यांनी अभिवादन सभा आयोजित करण्यामागील हेतू व बहिनाईची महती मांडली. यावेळी प्राचार्य डॉ वाघुळदे म्हणाले की, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यासारखे साहित्यरत्न खानदेश भूमीला लाभणे हे आपल्या साऱ्यांचे अहोभाग्य असून त्यांच्या साहित्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना करून दिला पाहिजे व प्रत्येकाने कवयित्री बहिनाईच्या ओव्या जीवनात अवलंबव्या असे आवाहन केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ कल्पना पाटील, उपप्राचार्य डॉ हरीश नेमाडे, डॉ जगदीश पाटील अधिष्ठाता, मानव्यविद्याशाखा कवयीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, यांच्यासहित प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.