Monday, March 17, 2025
Homeजळगावअखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्षपदी परमपूज्य श्री श्याम चैतन्य जी...

अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्षपदी परमपूज्य श्री श्याम चैतन्य जी महाराज यांची निवड

अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्षपदी परमपूज्य श्री श्याम चैतन्य जी महाराज यांची निवड

जामनेर : प्रतिनिधी खानदेश लाईव्ह न्युज
अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्षपदी श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे गादीपती परमपूज्य श्री श्याम चैतन्य जी महाराज यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
भारतातील १२७ संप्रदाय मिळून एकत्रित कार्य करणारी अखिल भारतीय संत समिती, वृंदावन धाम मथुरा उत्तर प्रदेशचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत वढोदा फैजपूर येथे दिनांक 20 व 21 ऑक्टोबर 2024 रोजी संपन्न झालेल्या महाराष्ट्र प्रांत समन्वय बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चिंतन करण्यात आले. या बैठकीत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातील संतांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. जामनेर येथील श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे गादीपती श्री श्याम चैतन्य जी महाराज यांना अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती पत्र अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष जनार्दन हरी जी महाराज, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज, महामंत्री स्वामी भारत आनंद सरस्वती जी महाराज यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील सर्व संप्रदायाचे संतगण उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या