अखिल स्तरीय महा-ई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटनाच्या भुसावळ तालुका अध्यक्ष पदी वैशाली सरदार
भुसावळ (खान्देश लाईव्ह) भुसावळ येथे रविवारी दि.०५ जानेवारी रोजी देशमुख कांप्युटर येथील सभागृहात अखिल स्तरीय महा-ई सेवा केंद्र व आधार केंद्र संघटनाची बैठक संपन्न झाली. त्या बैठकीचे अध्यक्ष स्थानी जिल्हा सचिव राकेश चव्हाण हे होते. त्याच्या उपस्थित भुसावळ तालुका कार्यकारणीची निवड बिनविरोध करण्यात आली.
तालुका अध्यक्ष पदी वैशाली सरदार यांची निवड करण्यात आली. भुसावळ तालुका कार्यकारणी पुढीप्रमाणे निवडण्यात आली.
त्यामध्ये उपाध्यक्ष अमोल राऊत , साचिव निलेश कोलते, सहसचिव निलेश पाटील,कोषाध्यक्ष अनिश देशमुख, सल्लागार अँड. सागर बहिरूणे याची निवड करण्यात आली.या बैठकीत भुसावळ शहर व तालुक्यातील महा- ई सेवा केंद्र व आधार केंद्र चालक मोठया संख्येने उपस्थित होते. बैठकीत स्थानिक समस्या वर चर्चा करण्यात आली व त्या संघटनेच्या माध्यमातून तालुका कार्यकारणी ने पुढाकार घेऊन सोडविण्याचे ठरविण्यात आले.
तालुका कार्यकारणीचे जिल्ह्याच्या वतीने व उपस्थितांनी स्वागत केले.
बैठकीला शहर व ग्रामीण केंद्र चालाकाची उपस्थिति होती . त्यामध्ये अमिन पटेल , समीर मन्सूरी, आकाश कोळी, वाजित खान, बी. एल. पवार, प्रकाश सरदार, संतोष कोळी, चंदन तायडे, फरजना बेगम अब्दुल रहुफ, नीलकंठ गव्हाले, इमल्यास कासम, गुलाब पवार, रईस अहमद ताजमोहमद, प्रथमेश जोशी, राहुल सपकाळे, नंदन सपकाळे, विकास चौधरी, अकीब बनीवाले, हरीश बोरसे, दिपक फेगडे, राहुल बरडे, शेख वसीम, इत्यादी उपस्थित होते. आभार व सुत्र संचालन अनिश देशमुख यांनी केले.