Wednesday, March 26, 2025
Homeजळगावअखेर जिल्ह्यातील नरभक्षक बिबट्या जेरबंद!

अखेर जिल्ह्यातील नरभक्षक बिबट्या जेरबंद!

अखेर जिल्ह्यातील नरभक्षक बिबट्या जेरबंद

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – चाळीसगाव तालुक्यातील गणेशपुरातील रिंकेश मोरे या १३ वर्षीय मुलाचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या गुरुवारी रात्री आठ वाजता पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. यामुळे वनविभागासह परिसरातील नागरिकांनी देखील सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, १५ रोजी गणेश – पाटणा रस्त्यावर मित्रांसमवेत धावत असतांना रिंकेश मोरे यामुलावर बिबट्याने झडप घालत त्याचा बळी घेतला होता. त्याचं दिवशी रात्रीच बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला होती. यानंतर वनविभागाने परिसरात पाच पिंज-यांसोबतचं १२ ट्रॅप कॅमेरेदेखील गुरुवारी यातील एका पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. गणेशपूर वलठाण शिवारात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पाच पिंजरे लावले गेले होते. यातील गणेशपूर – वलठाण शिवाराच्या मध्यभागी असलेल्या जाधव यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या