अखेर धनंजय मुंडेंनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा ! मस्साजोगचे सरपंच हत्त्याप्रकरण आले अंगाशी
मुंबई खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ देवगिरी बंगल्यावर अजित पवार, सुनील तटकरे व धनंजय मुंडे यांचे सोबत बैठक घेतली अखेर या बैठकीत धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला असता त्यांनी तो आज स्वीकारल्याचे वृत्त आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्त्या क्रूरपद्धतीने करण्यात आल्याने मारहाण व हत्येचे मारकऱ्यांसह १५ व्हिडिओ आणि ८ फोटो हाती आले आहेत. त्या दृष्टीकोनातून
सोमवारी ( ता. ३ ) रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन तास बैठक झाली. या बैठकीला धनंजय मुंडें यांच्यासह सुनील तटकरे, प्रफुल पटेल सुद्धा उपस्थित होते. बैठकीत राजीनाम्या बाबत चर्चा झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काल रात्री देवगिरी बंगल्यावर ८.५० वाजता बैठक सुरु झाली. त्यानंतर साडे दहा वाजता ही बैठक संपली धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून घोषणाबाजी करण्यात आली होती.