Sunday, April 27, 2025
Homeजळगावअज्ञात व्यक्तीने केळीचे घड कापून शेतकऱ्याचे ६ लाख रुपये नुकसान केले.

अज्ञात व्यक्तीने केळीचे घड कापून शेतकऱ्याचे ६ लाख रुपये नुकसान केले.

अज्ञात व्यक्तीने केळीचे घड कापून शेतकऱ्याचे ६ लाख रुपये नुकसान केले.

यावल तालुक्यातील घटना.

यावल दि.५ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी   यावल शिवारात एका शेतकऱ्याचे केळीचे घड कापून ६ लाख रुपयाचे नुकसान केल्याची घटना आज दि.६ रोजी घडल्याने शेतकऱ्यांन मध्ये घबराट निर्माण झाली आहे.

यावल शिवारात शेतकरी केशव गोवर्धन चौधरी यांचे शेतातील केळीचे ४ हजार खोड,अज्ञात इस माने कापुन फेकले त्यामुळे केशव चौधरी यांचे अंदाजे ५ ते ६ लाख रुपयाचे नुकसान झाले.
यावल तालुक्यात अट्रावल व यावल शिवारात केळीचे घड कापून शेतकऱ्यांचे अनेक वेळा लाखो रुपयांचे नुकसान अज्ञात आरोपींनी केले आहे त्यांचा तपास अद्याप लागलेला नाही.त्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम लावून केळी घड कापणारे कोण आहेत..? ते केळी घड कापून का फेकतात.? शेतकऱ्यांचे आणि त्यांचे वैमननस्य काय.? शेती शिवारात मोकाट फिरणारे माणसं आणि गुर-ढोर चारणारे कोण कोण आहे..? त्यांना या उपद्रवी केळी घड कापणाऱ्याची माहिती नाही का.? ठेंगे सोसायटी ठेंगे वाले काय करतात..? या सर्व बाबींची चौकशी यावल पोलिसांनी करायला पाहिजे तसेच शेती शिवाराच्या रस्त्यावर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास शेती साहित्य चोरीच्या घटनांना आणि केळी गड कापणाऱ्या घटनांना आळा बसेल…

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या