अट्रावल शिवारात अज्ञाता कडून शेतकऱ्यांचे नुकसान करणे सुरूच
विहीरीतील पंपाचे नुकसान व चोरी
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील अटरावल शिवारात गेल्या दोन महिन्या पासुन अज्ञात समाजकंटकाकडून शेतकऱ्यांचे नुकसान करणे सुरूच आहे .
शुक्रवारी अटरावल गावातील शेतकरी जगदीश बाऊस्कर यांचे शेतातील गट क्रमांक एकशे दहा मधील विहिरी वरील बसविलेला मोटर पंप सेट लोखंडी पोल हे साहित्य व पी व्ही सी डिलिव्हरी तोड फोड करून विहिरीवर बसविले लोखंडी पोल अज्ञात इसमाने विहीरीत टाकून नुकसान करण्यात आले आहे तसेच केबल वायर चोरी करण्यात आली आहे
या अज्ञात माथेफिरूंनी पाईप लाईन ची तोड फोड केली आहे .
सदर अज्ञात इसमा विरुद्ध यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे .
यावल पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला आहे.
संबधीत शेतकरी यांनी फैजपूर चे पोलीस उपविभागीय अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांची सुद्धा भेट घेऊन घटलेल्या प्रकारची माहिती दिली आहे .
त्यांनी लवकरच तपास करून आरोपीस पकडण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहेत.
तसेच रात्री पेट्रोलिंग करणे बाबत आदेश पोलीसांना दिले आहेत,
अट्रावल गावातील ही नुकसानी ची सहावी घटना आहे
या आधी सुध्दा केळी ची घड कापून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यात आलेले होते .
अट्रावल गावातील शेतकरी या नुकसानी मुळे खुप त्रस्त झाले आहेत. व दहशतीखाली आहेत
तरी आरोपीचा शोध घेवुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतक ऱ्यांनी केली आहे