Monday, March 17, 2025
Homeजळगावअतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या अधिकारी,पोलिसांवर दगडफेक.

अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या अधिकारी,पोलिसांवर दगडफेक.

अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या अधिकारी,पोलिसांवर दगडफेक!

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यावर असलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यासाठी गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाल्याने तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असून याबाबत शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल होतो किंवा नाही याकडे संपूर्ण शासकीय अधिकारी कर्मचारी वर्गाचे लक्ष लागून आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,यावल तालुक्यात वड्री हरिपुरा रस्त्यावर १५ ते २० लाख रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे परंतु पुलाच्या पुढे संबंधितांने अतिक्रमण केले असल्याने रस्त्याचे बांधकाम अपूर्ण राहिल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तडवी साहेब व त्यांचे कर्मचारी यावल पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यासाठी मंगळवार दि.२८ जानेवारी २०२५ रोजी गेले असता त्यांच्यावर त्या ठिकाणी शासकीय कामकाजात अडथळा आणून त्यांच्यावर दगडफेक केल्याची घटना घडल्याने यावल तालुक्यात शासकीय अधिकारी कर्मचारी वर्गात तसे नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे आणि याबाबत यावल पोस्टेला गुन्हा दाखल होतो किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या