Wednesday, March 26, 2025
Homeजळगावअतिक्रमण पथकासमोर एका तरूणाने स्वतःच्या अंगावर ओतले पेट्रोल!

अतिक्रमण पथकासमोर एका तरूणाने स्वतःच्या अंगावर ओतले पेट्रोल!

अतिक्रमण पथकासमोर एका तरूणाने स्वतःच्या अंगावर ओतले पेट्रोल!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील कासमवाडी जवळील रचना कॉलनीमध्ये वाढीव बांधकामावरून सुरू असलेल्या वादातून बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई सुरू करताच एका तरूणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आलहत्येचा प्रयत्न केला होता.
सुदैवाने वेळीच हस्तक्षेप झाल्याने मोठा अनर्थ टळला.
या तरूणाला एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.शेख शादाब आणि त्यांचे शेजारी इम्रान अहमद यांच्यात गेल्या एका वर्षापासून वाढीव बांधकामावरून वाद सुरू होता. दोघांनी जळगाव महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली होती.
अखेर बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाईसाठी तेथे धाव घेतली होती.सुरूवातील अतिक्रमण विभागाने इम्रान अहमद यांचे वाढीव बांधकाम पाडण्यात आले.त्यानंतर शेख शादाब यांचेही अतिक्रमण काढण्याचे काम सुरू होताच त्याने आक्रमक भूमिका घेतली. शेख शादाब याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालत संतापाच्या भरात स्वतःवर पेट्रोल ओतले आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला.घटनास्थळी असलेल्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून शेख शादाब यांना रोखले. त्यानंतर तातडीने एमआयडीसी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
काही वेळातच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने शेख शादाब यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या