Monday, March 24, 2025
Homeगुन्हाअपघात : रिक्षावर दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वार ठार

अपघात : रिक्षावर दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वार ठार

अपघात : रिक्षावर दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वार ठार

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरात रोजच छोटे मोठे अपघाताच्या घटना घडत असतांना या अपघातामध्ये अनेकांचा जीव जात आहे तर काहीना दुखापती होत आहे. नुकतेच दि.३० सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी काशिनाथ लॉज परिसरातील एका खासगी बँकेसमोर पुढे चालणाऱ्याला रिक्षावर दुचाकी धडकल्याने विजय मगन पाटील (३९, रा. अयोध्या नगर) हे दुचाकीस्वार ठार झाले.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, गुरांच्या बाजार परिसरात पानटपरी चालक असलेले विजय पाटील हे सोमवारी (३० सप्टेंबर) दुपारी ४ वाजता दुचाकीने जात असताना काशिनाथ लॉजजवळील खासगी बँकेसमोर पुढे चालणाऱ्या रिक्षावर दुचाकी धडकली. अपघातानंतर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. विजय पाटील यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. कुटुंबाचा आधार हरविल्याने या कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या