अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थ्याने घेतला टोकाचा निर्णय !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी हर्षल सुधाकर सोनवणे (१७, रा. दादावाडी) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (२१ ऑक्टोबर) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मूळचा भुसावळ येथील रहिवासी असलेला हर्षल सोनवणे हा तरुण दादावाडी परिसरात मामांकडे वास्तव्यास होता. त्याची आई शिक्षिका असून वडील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. हर्षल हा शहरातील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. सोमवारी हर्षल हा घरी एकटाच असताना त्याने घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत गळफास घेतला.