अल्पवयीन तरुणीला त्रास देणाऱ्या आरोपीचा जामीन फेटाळला
मलकापूर: मलकापूर येथील एका अल्पवयिन तरुणीला त्रास देणाऱ्या एका आरोपिचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. संशयित आरोपिने पिडीत तरुणीला वेळोवेळी पाठलाग करत त्रास दिला. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणीही 17 वर्ष 10 महिन्याची असून त्रास देणारा संशयित आरोपी हा 36 वर्षाचा आहे. आरोपी आणि पीडिच एकाच परिसरात राहत असून त्यांच्यात ओळख निर्माण झाली. या ओळखीतून संशयित आरोपा विष्णू मेहसरे याने पीडित तरुणीशी तिच्या मर्जीच्या विरुद्ध तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तरुणी विरोध करत असतानाही त्याने तिचा पाठलाग करुन तिचा त्रास दिला. तु मला आवडते, मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणत तो पीडित तरुणीचा पाठलाग करत असे. तसेच पीडिताच्या मर्जी विरुद्ध तिचा हात पकडून सेल्फी काढला. तसेच ओळखीचा गैरफायदा घेत तो पीडित तरुणीला शेगाव येथे घेऊन जात तिथे देखील त्याने पीडिताची इच्छा नसताना तिच्यासोबत जबरदस्ती सेल्फी काढला आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. विष्णू मेहसरे याच्या त्रासाला कंटाळून पीडिताने तिच्या आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यावर पीडित तरुणीच्या वडिलांनी देखील विष्णूला समजवत त्रास न देण्याचे सांगितले तरी देखील विष्णू हा पीडित तरुणीचा पाठलाग करत तसेच तिच्या मोबाईवर कॉल तसेच मेसेज करत त्रास देत राहीला. हा प्रकार असहाय्य झाल्याने पीडित तरुणीने अखेर मलकापूर शहर पोलिसात फिर्याद दिल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून विष्णू मेहसरे हा फरार आहे. दरम्यान, त्यान अटकपूर्व जामीनासाठी स्थानिक न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याच्या अर्ज फेटाळला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने देखील त्याचा जामीन फेटाळला आहे. दरम्यान फरार असलेल्या विष्णू याचा पोलीस तपास घेत आहे.