अल्पवयीन मुलावर लोखंडी वस्तूने वार
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी : काचेची बाटली फेकून का मारली असा जाब विचारल्याच्या कारणावरून आदित्य दीपक हातागडे (१६, रा. जुने बी. जे. मार्केटच्या बाजूला) या मुलाला तीन जणांनी लोखंडी वस्तू पोटावर मारून गंभीर दुखापत केली.
दरम्यान, ही घटना १ डिसेंबर रोजी जुने बी. जे. मार्केटच्या बाजूला कोंडवाडा परिसरात घडली. याप्रकरणी २ डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोंडवाडा परिसरात राहणारा आदित्य हातागडे याला एका जणाने काचेची बाटली फेकून मारली. त्याने जाब विचारला असता तीन जणांनी शिवीगाळ, मारहाण करत लोखंडी वस्तू पोटात मारून दुखापत केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.