Sunday, March 16, 2025
Homeगुन्हाअल्पवयीन मुलीला रिक्षात नेत केला अत्याचार !

अल्पवयीन मुलीला रिक्षात नेत केला अत्याचार !

अल्पवयीन मुलीला रिक्षात नेत केला अत्याचार !

अमळनेर : प्रतिनिधी खानदेश लाईव्ह न्युज
लहान बहिणीला शाळेत सोडून परत येणाऱ्या अल्पवयीन मुलीला तोंड दाबून रिक्षात निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील एका भागात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी शाळेकडून परत येताना पाठीमागून दिनेश रमेश भिल हा आला आणि मुलीला बळजबरीने एका बंद शाळेच्या गच्चीवर नेले. तेथे त्याने मुलीवर अत्याचार केला. दिनेशने मुलीला तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकेल, अशी धमकी दिली.
या झटापटीत पीडित मुलीचे कपडे फाटले. आरोपी मुलीला एकटा सोडून गेल्यानंतर मुलगी घाबरून पळत होती. तिला रस्त्यात तिचे आई-वडील भेटले. त्यांना हकीगत सांगितल्यावर आईसोबत येऊन मुलीने फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलिस स्टेशनला दिनेशविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या