Monday, April 28, 2025
Homeगुन्हाअल्पवयीन मुलीला शरीर सुखाची मागणी : एकाला अटक!

अल्पवयीन मुलीला शरीर सुखाची मागणी : एकाला अटक!

अल्पवयीन मुलीला शरीर सुखाची मागणी : एकाला अटक!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – खोटे नाव सांगून अल्पवयीन मुलीशी मैत्री केली तिच्यासोबत काढलेले आक्षेपार्ह फोटो जगजाहीर करण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच धमकी देणे सुरूच ठेवत शरीर सुखाचीही मागणी केली. याप्रकरणी आयान शेख नूर मोहम्मद (१९, रा. गेंदालाल मिल परिसर) याला अटक करण्यात आले असून त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला आयान शेख याने खोटे नाव सांगून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिच्यासोबत २२ डिसेंबर २०२४ रोजी आक्षेपार्ह फोटो काढले. ते फोटो व्हायरलची धमकी देत २६ रोजी पुन्हा तिचा विनयभंग केला. त्यानंतर धमकी देत शरीर सुखाची मागणी केली.
अखेर या प्रकाराला कंटाळून मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आयान शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या