अल्पवयीन मुलीवर अत्याचारातील संशयिताला भुसावळातून अटक!
वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वरणगाव येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी अनिल बारकू निकम रा.भुसावळ या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, पीडित मुलगी ही अल्पवयीन असून आरोपीने तिच्यावर दोन तीन महिन्या पूर्वी घरात एकटी असतांना अत्याचार केल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी वरणगाव पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. या तक्रारीवरून पोलीसांनी तत्काळ तपास सुरू केला. दरम्यान पोलिसांनी संशयित अनिल बारकू निकम रा. भुसावळ शोधून त्याला अटक केली. तपास तपास सपोनि जनार्दन खंडेराव करीत आहेत. या घटनेने समाजात खळबळ उडाली असून आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.