Monday, March 17, 2025
Homeगुन्हाअवैधरित्या गॅस रिफीलींग करणाऱ्यावर गस्तीवर पथकाने टाकला छापा : १३ भरलेले व...

अवैधरित्या गॅस रिफीलींग करणाऱ्यावर गस्तीवर पथकाने टाकला छापा : १३ भरलेले व पाच रिकामे सिलींडर जप्त !

अवैधरित्या गॅस रिफीलींग करणाऱ्यावर गस्तीवर पथकाने टाकला छापा : १३ भरलेले व पाच रिकामे सिलींडर जप्त !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – घरगुती वापराच्या गॅस सिलींडरमधून रिक्षात अवैधरित्या गॅस रिफीलींग करणाऱ्यावर गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. त्याठिकाणाहून १३ भरलेले व पाच रिकामे सिलींडर जप्त करण्यात आले. याप्रकरणी आफताब आलम शेख रहीम (वय २८, रा. रहमतपूर नशिराबाद, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही करवाई शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ कमलाकर बागुल, गजानन देशमुख, गोपाळ गव्हाळे, संघपाल तायडे, सचिन पोळ यांचे पथक रात्रीच्या गस्तीवर होते. गस्त करीत असतांना त्यांना नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या घरगुती गॅस सिलींडर मधून प्रवासी रिक्षा गॅस रिफिलींक करतांना दिसले. यावेळी रिक्षा चालकास संशय आल्याने तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. त्यानंतर पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता, तेथे आफताब आलंम शेख रहीम हा वाहनात गॅस भरतांना मिळून आला.
पथकाने संशयिताला ताब्यात घेतले असता, त्याच्याजवळ असलेली मालवाहतूक वाहन व त्यामध्ये ठेवलेले तेरा भरलेले गॅस सिलेंडर, पाच रिकामे यासह गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण ३ लाख ९६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या