Monday, March 17, 2025
Homeगुन्हाअवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रक वरणगांव नजिक पकडला ; गुन्हा दाखल!

अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रक वरणगांव नजिक पकडला ; गुन्हा दाखल!

अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रक वरणगांव नजिक पकडला ; गुन्हा दाखल!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी –
अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रक जळगाव गुन्हे शाखेने जप्त करीत संशयीत चालकाविरोधात वरणगांव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मंगळवार, 25 रोजी करण्यात आली आहे.
वरणगाव शहरातील आस्वाद हॉटेलच्या पुढे फुलगाव फाट्याजवळील उड्डान पुलाजवळ भुसावळ-मुक्ताईनगर नॅशनल हायवे पुलाखाली ट्रक (एम.एच.19 झेड. 4024) वरील चालक नामदेव बळीराम नन्नवरे (45, रा. गायवाडा बांभोरी, ता.धरणगाव) हा ट्रकमध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळल्याने वाळू सहीत वाहन जप्त करण्यात आले.

ट्रकमध्ये सहा हजार रुपये किंमतीची वाळू व चार लाख रुपये किंमतीचा ट्रक पोलीसांनी जप्त करण्यात आला.
चालक नन्नवरे याच्या विरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार प्रीतम पाटील, नाईक श्रीकृष्ण देशमुख, कॉन्स्टेबल रवींद्र कापडणे, कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या