Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हाअवैध गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांना अटक !

अवैध गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांना अटक !

अवैध गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांना अटक !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील वरणगाव येथील ऑडर्नन्स फॅक्टरी, मेन गेट साई मंदिराजवळ अमर परदेशी हा अवैध गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करत आहे, अशी बातमी मिळाल्यानंतर वरणगाव पोलिसांनी आरोपीस शस्त्रासह ताब्यात घेतल्याची घटना १८ रोजी घडली.

वरणगाव पोलिस ठाण्याचे स.पो.नि. जनार्धन खंडेराव यांना दुपारी याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांच्या मागदर्शनात पीएसआय रामदास गांगुर्डे, पो.हे.कॉ. यासिन पिंजारी, प्रेमचंद सपकाळे, प्रशांत ठाकूर, ईश्वर तायडे, विजय बावस्कर यांनी दोन पंचासह त्या ठिकाणी जावून खात्री केली. या वेळी हा व्यक्ती संशयितरित्या हालचाल करताना दिसला. त्याने त्याचे नाव अमर मधुकर कहार ऊर्फ परदेशी (वय ३०, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या कमरेला पाठीमागील बाजूस अवैध गावठी कट्टा तर पॅन्टच्या उजव्या खिशात दोन जिवंत काडतुस मिळाले. पोलिसांनी या प्रकरणी २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन ईश्वर तायडे यांच्या फिर्यादीवरुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या