Sunday, April 27, 2025
Homeगुन्हाअवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा : एलसीबीने केला उद्ध्वस्त

अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा : एलसीबीने केला उद्ध्वस्त

अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा : एलसीबीने केला उद्ध्वस्त

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील वाघळी येथे अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आला आहे. पोलिसांनी भरलेले व रिकामे अशा ९ गॅस सिलिंडरासह वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी लागणारे मशीन असा सुमारे ३१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

याबाबत एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, वाघळी येथे सर्रासपणे वाहनांमध्ये गॅस भरण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकून ९ हजार रुपये किमतीचे सीलबंद स्थितीत असलेले घरगुती वापराचे तीन सिलिंडर, १२ हजार रुपये किमतीचे सहा रिकामे सिलिंडर व १० हजार रुपये किमतीचे गॅस वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे प्रेशर मशीन व इलेक्ट्रिक मोटार तसेच प्लॅस्टिकच्या नळ्या, रेग्युलेटर व गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे कीट असा एकूण ३१ हजारांचा ऐवज जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हवालदार सुधाकर अंभोरे, राहुल पाटील, चालक भरत पाटील, हवालदार प्रवीण सपकाळे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी संशयित दीपक केवट (वाघळी) याच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या