Sunday, April 27, 2025
Homeगुन्हाअवैध गॅस रिफिलिंग सुरूच, चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

अवैध गॅस रिफिलिंग सुरूच, चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

अवैध गॅस रिफिलिंग सुरूच, चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पिंप्राळा परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनामध्ये गॅस भरणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत ११ गॅस सिलिंडरसह गॅस रिफिलिंगचे साहित्य जप्त केले. वसीम चंगा शहा (रा. ख्वॉजा नगर, पिंप्राळा), फिरोज अलाउद्दीन शेख (रा. पिंप्राळा हुडको), जुबेर खान उस्मान खान पठाण (रा. पिंप्राळा हुडको), अकलाख खान जहाँगीर खान (रा. ख्वॉजा नगर) या चौघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

ईच्छादेवी चौकामध्ये वाहनामध्ये गॅस भरताना स्फोट होवून सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर आता पिंप्राळा परिसरात हा प्रकार आढळून आला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड व पथकाने कारवाई केली. कारवाईत ११ घरगुती गॅस सिलिंडर, गॅस भरण्याच्या पाच मोटार, वजन काटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या