Monday, March 24, 2025
Homeजळगावआकाशवाणी केंद्रासमोर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुणांचा मृत्यू!

आकाशवाणी केंद्रासमोर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुणांचा मृत्यू!

आकाशवाणी केंद्रासमोर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुणांचा मृत्यू!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील आकाशवाणी केंद्रासमोरील रस्त्यावर भरधाव कारने जळगावकडे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजता घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे.कांतीलाल ऊर्फ कान्हा रमेश राठोड (वय २४) आणि रवींद्र किसन चव्हाण (वय ३०, दोन्ही रा. विटनेर तांडा, ता. जळगाव) अशी मयतांची नावे आहेत. कांतीलालच्या पश्चात आई आणि मोठा भाऊ तर रवींद्र चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, काका, आजोबा आणि काकू असा परिवार आहे.गुरुवारी सायंकाळी दोघे जण दुचाकीने (एमएच १९ ईएल ३११) शिरसोलीकडून जळगावकडे येत होते. शिरसोली गावातील आकाशवाणी केंद्राच्या टॉवरसमोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली.

या धडकेत दोघांचाही मृत्यू झाला तर त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांनी धाव घेत खाजगी वाहनातून दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या