Wednesday, March 26, 2025
Homeजळगावआकाशवाणी चौकात ट्रकची दुचाकीला जबर धडक : भुसावळ येथील महिलेच्या हाता-पायाचा झाला...

आकाशवाणी चौकात ट्रकची दुचाकीला जबर धडक : भुसावळ येथील महिलेच्या हाता-पायाचा झाला चुराडा !

आकाशवाणी चौकात ट्रकची दुचाकीला जबर धडक : भुसावळ येथील महिलेच्या हाता-पायाचा झाला चुराडा !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – उपचारासाठी दुचाकीवरुन येत असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला मागून येत असलेल्या लोखंडी अँगलने भरलेल्या ट्रकने धडक दिली. दुचाकीस्वार असलेल्या रागिणी चंपालाल पाटील (वय ४५, रा. साईनगर, भुसावळ) या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्यामुळे गंभीर जखमी झाल्या. ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा एक हात तुटून पडला होता तर पायाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, महामार्गावरील ही २४ तासातील दूसरी घटना घडल्यामुळे लोकप्रतिनिधींबद्दल रोष व्यक्त केला जात होता. भुसावळ येथे साई नगरात राहत असलेले चंपालाल पाटील हे सैन्यातून सेवानिवृत्त झालेले असून ते सद्या वरणगाव येथील औष्णीक विद्युत केंद्र येथे नोकरीस आहे. चंपालाल विद्युत पाटील व रागिणी चंपालाल पाटील हे दांम्पत्य भुसावळहून (एमएच १९, डीपी २४६७) क्रमांकाच्या दुचाकीने शहरातील खोटेनगर भागातील एका रुग्णालयात उपचारासाठी येत होते. सायंकाळी आकाशवाणी चौकात आल्यानंतर सिग्रल सुटलेला असतांना, चंपालाल पाटील हे सर्कलजवळून जात होते. मागून भरधाव वेगाने आलेल्या (सीजी ०४, एलडबल्यू १२९९) क्रमांकाच्या लोखंडी अँगल भरलेल्या ट्रकचा त्यांच्या दुचाकीला कट लागला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते दाम्पत्य खाली कोसळले. यावेळी रागिणी पाटील या ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांच्या हातावरुन आणि पायावर ट्रक गेल्याने त्यांचा हात तूटून पडला तर पायाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. तर चंपालाल पाटील हे किरकोळ जखमी झाले आहे.
ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडल्याचे समजातच परिसरातील नागरिकांसह त्याठिकाणी नियुक्त असलेल्या वाहतुक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिकेतून रागिए रागिणी पाटील यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्यव्यस्थ परस्थितीत उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून, महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. दाम्पत्याला चिरडलेल्या ट्रकस्ह चालकाला वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले. तो ट्रक जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या