Monday, April 28, 2025
Homeजळगावआक्षेपार्ह,धार्मिक भावना दुखावणारे आणि चिथावणीखोर फलक झळकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करा.

आक्षेपार्ह,धार्मिक भावना दुखावणारे आणि चिथावणीखोर फलक झळकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करा.

आक्षेपार्ह,धार्मिक भावना दुखावणारे आणि चिथावणीखोर फलक झळकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करा.

हिंदू राष्ट्र समन्वय समितीची मागणी.

यावल दि.२०  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
गुरुवार दि.१६ जानेवारी या दिवशी रावेर तालुक्यातील वाघोदा येथे काढलेल्या संदल मध्ये आक्षेपार्ह,
धार्मिक भावना दुखावणारे आणि चिथावणीखोर फलक झळकवल्या प्रकरणी आयोजक आणि संबंधित यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीतर्फे करण्यात आली.

यावल तालुक्यातील प्रांताधिकारी यांच्याकडे आज सोमवार दि.२० जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की.रावेर तालुक्यातील वाघोदा येथे १६ जानेवारी या दिवशी मुस्लिम समुदायाने संदल
मिरवणूक काढली होती.
त्यात पुढील आक्षेपार्ह गोष्टी निदर्शनास आल्या –
या संदल मध्ये औरंगजेब,टिपू सुलतान आणि ओवैसी बंधू यांचे फलक झळकावण्यात आले होते.
महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवराय यांचे सुपुत्र, कोट्यवधी हिंदूंचे प्रेरणास्थान असलेल्या धर्मवीर संभाजी राजे यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या औरंगजेबाचे छायाचित्र जाणीवपूर्वक चिथावच्या
भावनेने हातात धरण्यात आले होते.

ए.आय.एम्.चे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमचे अखिल भारतीय मुस्लिम
उपयकता संघाचे ) असदुद्दीन ओवैसी, अकबरुद्दीन ओवैसी, इम्तियाज जलील आदींचे फलक बनवण्यात आलेले होते.
यातील एका फलकामध्ये ज्यात ओवैसी बंधूंचा फोटो दिला होता त्यात १५ मिनिट असे शब्द जाणीव
पूर्वक लिहिण्यात आलेले होते.पूर्वी अकबरुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या भाषणात “१५ मिनिट साठी
पोलिसांना हटवा मग पाहूया कोणात किती ताकद आहे ते…” असे चिथावणी देणारे वक्तव्य केले होते जे सोशल मीडियावरून व्हायरल झाले होते. त्याचा संदर्भ घेत जाणीवपूर्वक हे १५ मिनिट शब्द त्यांच्या फलकावर लिहिले होते.संदलमध्ये चिनावल बीटचे स्थानिक पोलीसही उपस्थित होते; पण त्यांनीही हे सर्व पाहूनही
यासंदर्भात काहीच केले नाही. वरिष्ठांना कळवले नाही,संदलच्या आयोजकांना समज देऊन हे आक्षेपार्ह फलक काढून घेतले नाहीत.
आज 3 दिवस होऊन गेले तरी पोलिसांनी काहीही कारवाई न केल्याने संदल मध्ये बनवण्यात आलेले फलक नष्ट करून टाकण्यास पण सहाय्य झाले.

त्यामुळे या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आपल्याकडे मागणी करतो की….. संदल मध्ये आक्षेपार्ह चिथावणीखोर आणि धार्मिक भावना दुखावणारे फलक पकडल्याबद्दल ते आणि फलक धरणारे संबंधित आणि ते पकडू देणारे संदलचे आयोजक शाकिर टेलर,राजू तडवी,इस्लाम पटेल,
मकसूद,कालू मिस्त्री,अलीम मलक, अल्ताफ खान (उर्फ हवा),अजय तडवी,भवरा पिंजारी,तौसीफ
मलिक रिक्शावाला,शकील तडवी ( उर्फ बबलू ) , सर्व राहणार वाघोदा यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल
करावा.
‘हिंदूं कार्यकर्त्यांनी अफझलखान वधाचा फलक लावल्यावर स्वतःहून कारवाई करणारे पोलीस अशा
वेळी मात्र तक्रार करणाऱ्याची वाट पाहून वेळ घालवतात आणि आरोपींना पुरावा नष्ट करण्याची संधी देतात.सर्वोच्च न्यायालयाने हेट स्पीच संदर्भात दिलेल्या आदेशात चिथावणीखोर आक्षेपार्ह, धार्मिक भावना दुखावणारे भाषण केल्याबद्दल,लिखाण अथवा हावभाव केल्याबद्दल पोलिसांनी स्वतः हून गुन्हा नोंद करावा असे म्हंटलेले आहे.तरीही येथे पोलिसांनी वेळकाढूपणा केल्याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी.राज्यात
औरंगजेबचे उदात्तीकरण
सार्वजनिकपणे करणे,त्याचे फलक झळकवणे आदी कृत्यांवर बंदी
जिल्ह्यात बंदी घालण्यात यावी. अशाप्रकारे हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे धीरज सुभाष भोळे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन दिले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या