Wednesday, March 26, 2025
Homeजळगावआठवीतील विद्यार्थ्याने खड्यात उडी मारून बुडालेल्या दोन मुलांना वाचवले

आठवीतील विद्यार्थ्याने खड्यात उडी मारून बुडालेल्या दोन मुलांना वाचवले

आठवीतील विद्यार्थ्याने खड्यात उडी मारून बुडालेल्या दोन मुलांना वाचवले

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गटारीच्या कामासाठी खोदून ठेवण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात दोन लहान मुले बुडाली. मात्र, आठवीच्या मुलाने खड्यात उडी मारून त्यांना वेळीच बाहेर काढल्याने दोघांचे प्राण वाचले.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, संत प्रसाद नगरमध्ये गटारीचे काम सुरू असून कंत्राटदाराने सुमारे पाच फूट खोल खड्डे करून ठेवले आहेत. त्यात पावसाने हजेरी लावल्याने खोदून ठेवलेले खड्डे पाण्याने पूर्ण भरले होते शुक्रवारी संस्कार पारध्ये (६) आणि वेदांत पारध्ये (३) हे दोघे दुकानावर वस्तू घ्यायला बाहेर निघाले आणि गंमत म्हणून खड्डे बघायला गेले. त्यात एकाचा काठावर पाय घसरल्याने तो खड्यात पडला. दुसरा त्याला धरायला गेला असता तोही पाण्यात पडला. खाली माती होती त्यामुळे ते गाळात फसले. ही घटना राज महाजन (१३) या आठवीतील मुलाने पाहिली. त्यामुळे त्याने पटकन पाण्यात उडी मारली ० दोघांना बाहेर काढले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या