आता खानदेशात सुद्धा हत्या सत्र सुरू माजी उपसरपंचाची धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या .
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यभर संताप व्यक्त होत आहे. अशातच आता आपल्या खानदेशात अशीच एक घटना जळगावच्या कानसवाडा येथे आज शुक्रवारी ( २१ मार्च ) रोजी सकाळी ८ वाजता घडली. शिवसेनेचे ( शिंदे गट ) माजी उपसरपंच युवराज कोळी ( वय ३६ ) यांची गावातील तिघांनी धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या केली.यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राजकीय सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
कानसवाडा गावातील ३ जणांनी आज, शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शिवसेनेचे ( शिंदे गट ) माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात चाकू आणि चॉपरने सपासप वार करण्यात आल्याने उपसरपंच यांचा जागीच मृत्यू झाला.कोळी यांचा मृतदेह जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. या वेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.या प्रकरणी कानसवाडा गावात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण झाले असून,आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच फाशीची शिक्षा देण्यात यावी,अशी मागणी मृताच्या नातेवाईकांकडून होत आहे. दरम्यान,पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोधासाठी पथक नियुक्त करून आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले.