आत्मनिर्भर युवती कार्यशाळेअंतर्गत डिजिटल बँकिंग विषयावर मार्गदर्शन
यावल दि.७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती कार्यशाळेअंतर्गत प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार,डॉ.सुधीर कापडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे कार्यक्रम सुरू असून पाचव्या दिवशी सेंट्रल बँक ऑफ इंडिया यावल येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी गंगाधर पगारे ( मुख्ख रोखपाल ) यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन सुविधेकडे नागरिकांचे जास्त लक्ष लागलेले आहे. त्यामुळे पैसे खिशात घेऊन फिरण्याची गरज भासत नाही घरी बसून ऑनलाईन व्यवहार करू शकतो,ऑनलाइन लाईट बिल, मोबाईल बॅलन्स मारू शकतो. सध्या खेडोपाड्यात मिनी बँक सुविधा असल्याने बँकेत जाण्याची जास्त गरज नागरिकांना भासत नाही आधार लिंक, ए.टी.एम, कॅशलेस ही सुविधा सगळीकडे निर्माण झालेली असल्याने जास्त बँकेतील रांगेत उभे राहण्याचा ताण पडत नाही असे सांगितले. बँकेमध्ये खाते ही म्हणजे बचतीची सुविधा आहे. तसेच पगार यांनी बँकेचा फॉर्म कसा भरायचा, चेक कसा भरायचा, जमा पावती कशी भरावी ह्या संदर्भात विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
दुसरे वक्ते गजेंद्र पाटील ( सेंट्रल बँक ऑफिसर ) यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की भारतात रिझर्व बँक ही सर्वात मुख्य बँक आहे. त्याच्या अनेक शाखा आहेत त्यातील सेंट्रल बँक हे एक महत्त्वाची शाखा आहे.या बँकेच्या योजना वेगवेगळ्या आहेत सुकन्या योजना दहा वर्षाच्या बालिकांचे खाते आई सोबत उघडावे लागते, जीवन ज्योती योजना वयाच्या ५० वर्षापर्यंत चालते, त्यात नैसर्गिक रित्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये मिळतात, सुरक्षाविमा ७० वर्षापर्यंत अपघात झाल्यास सुरक्षा विमा मिळत असतो. अटल पेन्शन योजना, शेतकरी विमा योजना,मूड आयोगासाठी योजना कर्ज,पापड उद्योग,केळी उद्योग, यासाठी बँकेकडून कर्ज व लोण मिळते या संदर्भात माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा रावते यांनी केले तर आभार डॉ. वैशाली कोष्टी यांनी मानले कार्यक्रमाला डॉ. निर्मला पवार, प्रा.भावना बारी, डॉ.संतोष जाधव,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.अर्जुन गाढे,प्रा.अक्षय सपकाळे,प्रा.हेमंत पाटील,प्रा.प्रशांत मोरे,प्रा.इमरान खान,प्रा.रामेश्वर निंबाळकर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर,दुर्गादास चौधरी,प्रमोद कदम,प्रमोद भोईटे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.