Sunday, March 16, 2025
Homeजळगावआदर्श नागरिक होण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा  - प्रांताधिकारी जितेंद्र पाटील !

आदर्श नागरिक होण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा  – प्रांताधिकारी जितेंद्र पाटील !

आदर्श नागरिक होण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा  – प्रांताधिकारी जितेंद्र पाटील !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – प्रत्येक व्यक्तीने आदर्श नागरीक होण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न करावा असे प्रतिपादन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील साहेब यांनी केले आहे.ते निवडणूक विभाग भुसावळ तर्फे आयोजित राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते. त्यांनी सांगितले कि आनंदासाठी विविध छंद जोपासावे, सकारात्मक राहून  स्वतः मध्ये लहानलहान सुधारणा घडवत राहावे त्यातून आदर्श व्यक्तिमत्व घडण्यास मदत होईल.

 

प्रांत कार्यालय भुसावळ येथे 24 जानेवारी 2025 रोजी दुपारी 10.00 वाजता आयोजित केलेल्या राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त कार्यक्रमासाठी मा . तहसीलदार नीता लबडे, श्री राजेंद्र फातले मुख्याधिकारी नगरपालिका भुसावळ, श्री सचिन राऊत मुख्याधिकारी नगरपालिका वरणगाव,  श्री किशोर वायकोळे गटशिक्षणाधिकारी भुसावळ,  परवेज अहमद उपमुख्याधिकारी, श्री बी डी धाडी शिक्षण विस्तार अधिकारी, भुसावळ हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून नायब तहसीलदार प्रीती लुटे यांनी राष्ट्रीय मतदार दिन आयोजनामागची भूमिका व हेतू सविस्तर पणे मांडला.

 

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सर्व उपस्थितांनी श्री किशोर वायकोळे यांच्यासोबत प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमास आमंत्रित विशेष वक्त्या सौ स्मिता जयकर (कोटेचा महिला महाविद्यालय भुसावळ ) यांनी भारतीय निवडणूक आयोगाची वाटचालीचा इतिहास त्याचबरोबर भारतीयांची राजकीय विचारप्रणाली विषयीची मानसिकता मांडली. तरुणांच्या सहभागानेच देशाचे उज्वल भवितव्य घडू शकते असा विश्वासही व्यक्त केला. उपस्थितांना उदबोधित करताना तहसीलदार नीता लबडे यांनी मतदारांनी आपले नाव योग्य यादीत आहे का याची खात्री करून घ्यावी व आपल्या परिसरातील अधिकाधिक नवमतदारांना नोंदणी करण्यास प्रवृत्त करावे कारण मतदानाचा हक्क बजावणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे असे आवाहन केले. मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी निवडणूक विभागाचे संगणक चालक घेत असलेल्या परिश्रमांची प्रशंसाही त्यांनी केली.मनाली गणेश कुलकर्णी या विद्यार्थिनीने याप्रसंगी  निवडणूक प्रक्रियेविषयी आपले वक्तृत्व सादर केले.
मतदार दिनानिमित्त आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा यामधील विजेत्या विद्यार्थी, सर्व परीक्षक यांच्या सह आदर्श बी एल ओ, निवडणूक विभागाचे सर्व संगणक चालक यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री किशोर वायकोळे, गटशिक्षणाधिकारी  भुसावळ यांनी केले.सूत्रसंचालन शैलेंद्र महाजन यांनी केले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत गुरव (नायब तहसीलदार),  के आर तडवी,  शरीफ तडवी,  श्याम बहादुरगिरी,  सचिन अरुण पाटील यांनी परिश्रम घेतले.

उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सन्मान !

वर्षभर निवडणूक प्रक्रियेमध्ये सक्रिय राहून आपापल्या मतदान केंद्रस्तरावरील विविध उपक्रम यशस्वी राबवणारे, मतदार याद्या अद्यावत करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे.यात राजेंद्र मोहन पाटील, सागर विजय कुलकर्णी, सय्यद तौसीफ अहमद मेहरबान अली, ज्ञानदेव नामदेव पाटील,  सुनिता धोंडू भोई, वैभव रमेश पाटील यांना आदर्श बीएलओ म्हणून सन्मानित करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या