आपल्या प्रवासी दुसऱ्या गाडीत बसत असल्याच्या कारणामुळे हाणामारी ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!
धरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आपल्या गाडीतील प्रवासी दुसऱ्या गाडीत बसत असल्याच्या कारणामुळे प्रवाशाला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोना मिलिंद अशोक भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास बसस्टॅन्डसमोर अतुल मधुकर वारडे (धानोरा) याची आई व बादल आकाश शिरसाठ (अशोक सम्राट नगर उधना सुरत) असे संदीप संजय कंखरे (धरणगाव) यांच्या गाडीत बसले होते. मात्र, दुसरी गाडी निघत असल्याने अतुल वारडे याची आई व बादल शिरसाठ हे दोन्ही दुसऱ्या गाडीत बसले. त्यामुळे संदीप संजय कंखरे याने अतुल वारडे याच्या आईला शिवीगाळ केली. तेथे असलेले धरणगाव पोलिस स्टेशनचे पोना मिलींद अशोक भामरे हे संदीपला बोलण्यास गेले असत त्याने त्यांना देखील शिवीगाळ केली त्यामुळे संदीपला धक्का लागल्याने त्याचा तोल गेला आणि तो तोंडावन पडल्याने त्याचे दात तुटून तो जखम झाला.
यावेळी स्वप्नील उर्फ सोनू पाडुरंग धनगर (धरणगाव) याने बादल शिरसाट याला दगड मारून जखमी केले. त्यामुळे बादल शिरसाठ हाही या घटनेत जखम झाला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनचे पोना मिलिंद अशोक भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोहेकों चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.