Sunday, April 27, 2025
Homeजळगावआमदार अमोल जावळे यांची ' गो ' शाळेला भेट.

आमदार अमोल जावळे यांची ‘ गो ‘ शाळेला भेट.

आमदार अमोल जावळे यांची ‘ गो ‘ शाळेला भेट.

रावेर विधानसभा मतदार संघात गोशाळेला भेट देणारे ठरले पहिले आमदार.

यावल दि.३१  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आ.अमोल जावळे यांनी आज मंगळवार दि.३१ डिसेंबर २०२४ रोजी यावल तालुक्यात यावल भुसावळ रोडवरील निमगाव येथील गोवर्धन ” गो ” शाळेला तथा गोतीर्थाला भेट देऊन केले ‘गो’ पूजन केले.

राजकीय इतिहासात रावेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय तरुण तडफदार आमदार अमोल जावळे ‘ गो ‘ शाळेला भेट देऊन गो पूजन करणारे पहिले आमदार ठरले.याप्रसंगी आमदार अमोल जावळे यांनी गोमातेचे विधिवत पूजा करून गाईंना गोग्रास खाऊ घातला.गोमातेचे जतन,रक्षण व संवर्धन होणे ही काळाची गरज आहे.यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन होते अशा प्रकारचे प्रतिपादन आमदार जावळे यांनी केले व गोसंवर्धन व रक्षणाची शाश्वती दिली.तसेच गोशाळेतील गाईंच्या सेवेचे व संगोपनाचे विशेष कौतुक केले.

यावेळी गोशाळेचे अध्यक्ष गोपाळ कोळी,उपाध्यक्ष अरुण तावडे,सचिव चेतना कोळी,सदस्य बाळू कोळी,लिलाबाई कोळी,विजया तावडे,सुरज सोनवणे,
सुरज राजपूत,संचित कोळी महाराज,संजय तावडे,
जगदीश कोळी,भोजराज ढाके,साई चव्हाण,यश वारके,विनायक बारी,पंकज चौधरी,अभिषेक सोनवणे,कृष्णा पाटील,गिरीश बारी,प्रकाश कोळी,
सविता कोळी,छाया पाटील,अलका कोळी, कल्पना पाटील व निमगाव व टेंभी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार यावल येथील सरस्वती विद्या मंदिरातील शिक्षक डॉ.नरेंद्र महाले यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या