Monday, March 17, 2025
Homeजळगावआमदार जावळेनी यावल येथील श्री स्वामी समर्थांचे घेतले दर्शन.

आमदार जावळेनी यावल येथील श्री स्वामी समर्थांचे घेतले दर्शन.

आमदार जावळेनी यावल येथील श्री स्वामी समर्थांचे घेतले दर्शन.

यावल दि.१४  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  येथील भुसावळ रोडवरील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ नाम जप सोहळा सुरू आहे या धार्मिक कार्यक्रमात आज शनिवार दि.१४ रोजी सकाळी १० वाजता आमदार अमोल जावळे यांनी भेट श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन उपस्थित भाविकांच्या नागरिकांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या,तसेच यावेळी साने गुरुजी विद्यालयातील शिक्षकांनी भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले.
बीएसएनएल ऑफिस जवळ श्री स्वामी समर्थ बालसंस्कार व सेवा केंद्रात गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू आहे,विविध देवतांचे यज्ञ मंडपात मांडणी व पूजन तसेच आठवडाभर अखंड रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ नाम जप,श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचन असे अखंड कार्यक्रम सुरू आहे, सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत यावल व तालुक्यातील महिला तर संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत पुरुष अखंड नामजप सप्ताहात मोठ्या संख्येने सहभाग घेत आहेत.
सप्ताहात रोज धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत असून यात पहिल्या दिवशी ग्रामदेवता सन्मान मंडळ मांडणी,अग्नी प्रदीपन तर दुसऱ्या दिवशी मंडळ स्थापना, अग्नी स्थापना,स्थापित देवता हवन याच बरोबर तिसऱ्या दिवशी नित्य सहकार गणेश याग मनोबल, चौथ्या दिवशी नित्य सहकार चंडी याग स्वामी याग,रुद्र मल्हार याग, सत्य दत्त पूजन,देवता विसर्जन व अखंड नाम जप यज्ञ होणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या