आरक्षण वाचवायचे असेल, वंचित आघाडी शिवाय पर्याय नाही : प्रकाश आंबेडकर !
सावदा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सध्या आरक्षणाचा गळा घोटण्याचे काम देश पातळीवर सुरू असून आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला विजयी करा त्याशिवाय पर्याय नाही असे आवाहन पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.ते फैजपूर येथील प्रचार सभेत बोलत होते.
रावेर यावल मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शमिभाताई पाटील यांच्या प्रचारासाठी फैजपूर येथे आज बाळासाहेब आंबेडकर यांची सभा उत्साहात संपन्न झाली.यात आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार फटके बाजी केली.यात त्यांनी आरक्षण बचावची हाक दिली. सरकारला आरक्षण संपवायचे असल्याने नागरिकांनी अतिशय सुजाणपणे वंचितला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. इतर पक्ष जाती धर्माचे नाव घेवुन प्रचार करीत आहे त्यांना त्यांची जागा दाखवुन द्या असेही त्यांनी सांगितले .
