आरटीओ अधिकाऱ्यांची त्या वाळू माफियाशी लागेबांध? साधला समन्वय,भुसावळ विभागात जोरदार चर्चा
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गेल्या दोन दिवसापूर्वी भुसावळ जामनेर रोडवर गोजोरा परिसरात एक वाळूने भरलेले डंपर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी पकडले परंतु त्यात समन्वय साधला गेल्याची जोरदार चर्चा संपूर्ण भुसावळ विभागात आहे.
गोजोरा परिसरात वाळूने भरलेले एक डंपर पकडून ते डंपर आरटीओ अधिकाऱ्यांनी एका अज्ञात ठिकाणी नेऊन एक ते दोन तास कारवाईचा देखावा करून शेवटी कार्यवाहीच्या नावाखाली समन्वय साधल्याने ते डंपर वाळूसहीत त्याच मार्गाने भुसावळ कडे परत आल्याने आरटीओ यांच्या नावाखाली वाळू प्रकरणात सुद्धा मोठमोठे आर्थिक व्यवहार होत असल्याची जोरदार चर्चा भुसावळ विभागात आहे.वाळूने भरलेले डंपर आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडले, आणि ते डंपर कुठेतरी नेत असल्याचे रस्त्याच्या आजूबाजूस शेतात असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष बघितले आणि या डंपर मधून त्या आरटीओ अधिकाऱ्यांना काय काय प्राप्त झाले..? डंपर चालकाजवळ वाळू वाहतुकीचा परवाना होता किंवा नाही..? किंवा नसल्यास एक ते दोन तास कोणत्या प्रकारे चौकशी करण्यात आली…? डंपर मध्ये अवैध गौण खनिज असल्याने अवैध गौण खनिज याची नोंद भुसावळ किंवा जळगाव तहसील ऑफिसला झाली आहे किंवा नाही..? किंवा याबाबत सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात नोंद करण्यात आली का..? गौण खनिज धारकांवर कारवाई करण्याचे अधिकार आता आरटीओला सुद्धा देण्यात आले आहेत का..? यांनी आतापर्यंत अशा प्रकारे किती डंपर चालकांवर कारवाई केली..? ज्या डंपर वरती अदृश्य असे वाहन क्रमांक आहे त्यांच्यावर आरटीओ अधिकारी काय कारवाई करीत आहे.? इत्यादी अनेक प्रश्न गोजोरा परिसरातील शेतकऱ्यांसह अवैध वाळूधारकांमध्ये सुरू आहे.
याकडे आता खुद्द जिल्हाधिकारी जळगाव यांच्यासह लोकप्रतिनिधीनी लक्ष केंद्रित करून कारवाई करायला पाहिजे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.