दिपनगर प्रोजेक्ट गेट समोर विल्हाळे ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन .
आ . एकनाथराव खडसे यांच्या मध्यस्थीनंतर लेखी आश्वासनाने आंदोलन मागे
वरणगाव ( वार्ताहर ) दिपनगर प्रशासनाकडून सीएसआर फंडात दुजाभाव केल्याप्रकरणी वेल्हाळे, उदळी व जाडगाव या गावातील ग्रामस्थांनी दिपनगर प्रोजेक्ट कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते .
हे आंदोलन पाच तास चालले अखेर आ . एकनाथराव खडसे यांनी सुद्धा आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर दिपनगर अधिकाऱ्यांनी येऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे .
दिपनगर प्रशासनाकडून परिसरातील विविध गावांना सी एस आर फंडाची रक्कम दिली जाते या फंडाच्या रक्कम मध्ये विल्हाळे इतर काही गावांमध्ये दुजाभाव केल्याचे दिसून आले आहे .
या कारणाने विल्हाळे येथील ग्रामस्थ व जाडगाव उ दळी या गावातील सरपंच यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता .
या आंदोलनामध्ये महिला आक्रमक झाल्या होत्या महिलांनी थेट अधिकाऱ्यांना चोप देण्याचाही प्रयत्न यावेळी केला होता . विशेष म्हणजे या ठिकाणी स्वतः आमदारावर एकनाथराव खडसे यांनी सुद्धा या आंदोलनमध्ये सहभाग घेतल्याने दिपनगर प्रशासनाचे प्रोजेक्ट अभियंता शशांक चव्हाण व उप अभियंता मनोहर तायडे यांनी या ठिकाणी भेट दिली .
एकनाथराव खडसे यांनी कोणी आमदार तुमच्यावर याबाबत दबाव आणत असेल तर ते चुकीचे असून या लोकांना न्याय न मिळाल्यास आम्ही आम्ही आंदो मागे घेणार नाही असे सांगितले होते .
यावेळी अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली .
त्यावेळी लेखी आश्वासन देण्यात येऊन संबंधित गावाच्या सी एस आर फंडामध्ये वाढ करण्यात येणार असून आम्ही वरिष्ठाकडे याबाबतचा अहवाल पाठवला आहे असे सांगण्यात आले आहे .
या आंदोलनामध्ये वेल्हाळे येथील नागो पाटील ,दे बा पाटील , जाडगाव येथील वाय आर . पाटील सर , उदळी सरपंच , उपसरपंच आजी उपस्थित होते .
विशेष म्हणजे यावेळी महिलांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसून आले आहे . तसेच सिक्युरिटी वाल्यांनी सुद्धा यावेळी आंदोलनकर्त्यांवर दबाव टाकल्याचे दिसून आले .