Tuesday, April 29, 2025
Homeजळगावआ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या चोपडा विधानसभा मतदारसंघासह यावल तालुक्यात कोट्यवधी रुपयाचे विकास कामांचा...

आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या चोपडा विधानसभा मतदारसंघासह यावल तालुक्यात कोट्यवधी रुपयाचे विकास कामांचा धूम धडाका सुरू.

आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या चोपडा विधानसभा मतदारसंघासह यावल तालुक्यात कोट्यवधी रुपयाचे विकास कामांचा धूम धडाका सुरू.

यावल दि.१६    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शनिवार दि.१५ मार्च २०२५रोजी चोपडा विधानसभा मतदार संघात म्हणजे यावल तालुक्यातील किनगाव- डांभुर्णी व साकळी- दहिगाव जिल्हा परिषद गटांमध्ये आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन प्रा.चंद्रकांत सोनवणे आ.चोपडा विधानसभा यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले व विकास कामांचा धुमधडाका मोठ्या प्रमाणात सुरू झाला.
डांभुर्णी ते दगडी २ कि.मी. रस्ता मजबुतीकरण ५४ लाख ५७ हजार, चिंचोली सरफेस टॅंक बांधणे १३ लाख २१ हजार, किनगाव डोनगाव साठवण बंधारा बांधणे २२ लाख ६४ हजार रुपये,कासारखेडा ते किनगाव १ किमी रस्ता मजबुतीकरण व काँक्रिटीकरण करणे ६ लाख रुपये,वाघझिरा शासकीय आश्रम शाळेचे विज्ञान केंद्र उभारणे ८५ लाख रुपये, बहुउद्देशीय हॉलची दुरुस्ती ३० लाख २९ हजार रुपये,बहुउद्देशीय हॉलची दुरुस्ती २८ लाख ६९ हजार रुपये,वाघझिरा आश्रम शाळेत फेवर ब्लॉक बसवणे दहा लक्ष रुपये,वाघोदा साठवण बंधारा बांधणे २२ लाख ५९ हजार, राष्ट्रीय मार्ग ०४ ते चुंचाळे गायरान रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण २९ लाख ७६ हजार रुपये,चुंचाळे येथे साठवण बंधारा बांधणे १७ लाख ९३ हजार, साखळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती करणे १२ लाख रुपये,सावखेडा सीम ते साखळी १ किमी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ५४ लक्ष ५७ हजार रुपये,
थोरगव्हाण तालुका यावल ग्रामपंचायत कार्यालय बांधणे २० लाख रुपये,सावखेडा सिम येथे गॅबियन बंधारा बांधणे ६ लाख ८१ हजार रुपये अशाप्रकारे कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन चोपडा विधानसभेचे आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी सुभाष आप्पा साळुंखे,सूर्यभान पाटील सर,भरत चौधरी सर,आबा पाटील, विनायक पाटील,लक्ष्मण बडगुजर, गोटू भाऊ साळुंखे,दिनेश साळुंखे, समाधान सोनवणे,सुधाकर पाटील, बाळू पाटील,अनिल बडगुजर,
अण्णा कोळी,दीपक कोळी,मनोज धनगर,दिनकर माळी,संजय पाटील,विनोद खेवलकर,महेंद्र महाजन,मुबारक तडवी,कुर्बान तडवी,कलिंदर तडवी मतदारसंघातील प्रत्येक गावातील शिवसेनेचे पदाधिकारी भूमिपूजनाच्या वेळेस उपस्थित होते
आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी चुंचाळे रस्ता डांबरीकरण निधी मंजूर करून दिला व ती समस्या सोडवली यापूर्वी देखील चुंचाळे रस्त्यासाठी निधी मंजूर केला रस्ता चांगल्या प्रकारे करून घेतला तसेच चुंचाळे,वाघोदा,क किनगाव,डोनगाव साठवण बंधारे साठी निधी,साखळी प्राथमिक आरोग्य केंद्र साठी निधी, वाघझिराआश्रम शाळेसाठी दुरुस्ती व विकास कामनिधी,थोरगव्हाण ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम, यावरील सर्व कामांसाठी चोपडा विधानसभेचे आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन विकास कामांचे भूमिपूजन आपल्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत केले विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही व आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे सदरची विकास कामे उत्कृष्ट,चांगल्या प्रतीची करून घेणार असल्याची माहिती भरत सर चौधरी यांनी दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या