Thursday, March 27, 2025
Homeजळगावइंजिनीअरिंगिंचे शिक्षण झाले, नोकरी सोडली अन मुलीने संपविले आयुष्य !

इंजिनीअरिंगिंचे शिक्षण झाले, नोकरी सोडली अन मुलीने संपविले आयुष्य !

इंजिनीअरिंगिंचे शिक्षण झाले, नोकरी सोडली अन मुलीने संपविले आयुष्य !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – कानळदा येथे गुरांच्या गोठ्याजवळ असलेल्या हौदामध्ये प्रियंका रवींद्र भंगाळे (३१, रा. कानळदा, ता. जळगाव) या तरुणीने आत्महत्या केली. ही घटना शनिवार दि.२५ जानेवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, प्रियंका भंगाळे या तरुणीचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले असून ती मध्यंतरी पुणे येथे नोकरीला देखील होती. दोन वर्षांपूर्वी ती गावी परतली व आई-वडिलांसोबत राहत होती. शनिवारी सकाळी घराच्या मागे गुरांच्या गोठ्यानजीक असलेल्या पाण्याच्या हौदात तिने आपले जीवन संपविले. काही वेळाने तिचे काका गोठ्याकडे गेले त्या वेळी त्यांना तरुणी पाण्यात बुडलेल्या अवस्थेत दिसली. त्या वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या