Wednesday, March 26, 2025
Homeजळगावइयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ शिस्त पद्धतीने सुरू.

इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ शिस्त पद्धतीने सुरू.

इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ शिस्त पद्धतीने सुरू.

यावल दि.१० खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल नगर परिषद संचलित,
पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल येथे इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ केंद्र क्रमांक ३३ १३ ०१ या ठिकाणी यावल तालुक्यातून विविध शाळांमधून एकूण २५८ विद्यार्थी ११ ब्लॉक मध्ये या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत परीक्षा अतिशय शिस्तबद्ध व शांतता पूर्ण वातावरणात सुरू झाली.
या परीक्षेत २५८ प्रविष्ट पैकी २४४ विद्यार्थी हजार होते तर एकूण १४ विद्यार्थी गैरहजर होते परीक्षा केंद्रावर केंद्रप्रमुख समूह साधन केंद्र दहिगाव येथील विजय ठाकूर यांनी परीक्षा केंद्रास भेट दिली व समाधान व्यक्त केले.परीक्षेकामी पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील मुख्याध्यापक एम के पाटील सर व पर्यवेक्षक तथा केंद्र संचालक विजय नन्नवरे सर पर्यवेक्षक व्ही. ए.काटकर सर त्याचप्रमाणे परीक्षेकामी ज्येष्ठ शिक्षक डी.एस. फेगडे सर व ज्येष्ठ शिक्षक पी.एन. सोनवणे सर यांनी कामकाज पाहिले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या