Sunday, April 27, 2025
Homeजळगावउद्या कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांचे भुसावळात जल्लोषात होणार स्वागत !

उद्या कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांचे भुसावळात जल्लोषात होणार स्वागत !

उद्या कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांचे भुसावळात जल्लोषात होणार स्वागत !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहराला दुसऱ्यांदा आमदार संजय सावकारे यांच्या रुपाने मंत्रीपद मिळाल्यानंतर शहरवासीयांसह कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह व जल्लोषाचे वातावरण आहे. नागपूर येथे मंत्री मंडळ विस्तारात आमदार संजय सावकारे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर त्यांचे प्रथमच शहरात रविवार, 22 डिसेंबर रोजी शहरात आगमन होत आहे.कॅबिनेट मंत्री सावकारे यांच्या स्वागतासाठी शहर सजवण्यात आले असून सर्वदूर डिजिटल बॅनर, पताका लावण्यात आल्या आहेत.
खान्देश लाईव्ह न्यूज 
कॅबिनेट संजय मंत्री सावकारे यांचे रविवारी दुपारी शहरात आगमन झाल्यानंतर दुपारी दोन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर त्यांची भव्य स्वागत रॅली काढण्यात येणार आहे. उघड्या जीपमधून मंत्री सावकारे हे जनतेला यावेळी अभिवादन करणार आहे.डीजे व ढोल-ताशांच्या गजरात ही रॅली यावल रोडवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यामार्गे मंत्री सावकारे यांच्या संपर्क कार्यालयापर्यंत रॅली आल्यानंतर तिचा समारोप होईल.संजय भाऊ सावकारे यांची मंत्री पदी वर्णी लागल्याने भुसावळ तालुका व शहरवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत . विकास कामाचा वेग आता वाढणार असून शहराचा कायापालट होणार असल्याच्या भावना जनतेच्या मनात असल्याने संपूर्ण भुसावळ नामदार संजय भाऊ सावकारे यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे
यावेळी मंत्री सावकारे यांचा विविध संस्था, संघटनांतर्फे यांचा सहृदय सत्कार करण्यात येणार आहे. शहरवासीयांनी व महायुतीतील सर्व पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या