उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून युवकाचे
लोखंडी पाईपाने डोकं फोडले!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – उधारीचे पैसे मागीतल्याच्या कारणावरुन तरुणाच्या छातीत बुक्का मारुन लोखंडी पाईपाने डोके फोडले. ही घटना गुरुवार, २३ रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास दिनकरनगर, मोहन टॉकीजवळ शहरात घडली.गौरव सुभाष सोनवणे (वय २९, रा. मोहन टॉकीज परिसर) यानी विनोद भावलाल सोनवणे (वय ५५ रा. मोहनटॉकीज परिसर) याना दिलेले उधारीचे पैशांची मागणी केली. याचा राग येऊन विनोद यानी मारहाण करण्यास सुरुवात केली. लोखंडी पाईप डोक्यात टाकल्याने गौरव सोनवणे जखमी झाले.
या प्रकरणी तक्रारीनुसार शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक विजय निकम हे करीत आहेत