एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे म्हणून भुसावळात रेणूका मातेला साकडे
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शिवसेनेचे नेते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी भुसावळ येथे रेणूका माता मंदिरात आरती करून साकडे घालण्यात आले आहे .
शिवसेना जिल्हाप्रमुख सौ नंदाताई प्रकाश निकम रावेर लोकसभा क्षेत्र व सहकारी महिला यांनी मा . एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून महिलांनी व जिल्हाप्रमुख यांच्या तर्फे गुजर कॉलनी रेणुका माता मंदिरात आरती करण्यात आली आहे .सर्व समावेशक पद्धतीने राज्य चालवून महिलासाठी व शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या साठी विकासाचे कार्य करणारे नामदार एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे ईच्छा रेणूका माते समोर व्यक्त करण्यात आली आहे यावेळी शिवसैनिक महिला उपस्थित होते .