एकाच्या घरातून साडे सहा लाख ऐवज लंपास !
अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील वावडे येथील एकाच्या घरातून साडे सहा लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना २८ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,तालुक्यातील वावडे येथील संजय राजधर पाटील (वय ५२) हे २३ रोजी शालकाची प्रकृती खराब असल्याने त्याला भेटायला सुरत येथे गेले होते. जाताना त्यांनी घराची चाबी गावातील ओळखीच्या व्यक्तीकडे दिली होती. दरम्यान, २५ रोजी ते सहकुटुंब घरी परतले. २८ रोजी पैसे लागणार असल्याने त्यांनी कपाट उघडून पाहिले असता त्यातील ३ लाखांची रोख रक्कम, ९५ हजाराचे १९ ग्रॅमचे सोने, ८५ हजाराच्या १७ ग्रॅमच्या सोन्याच्या ३ अंगठ्या व १ लाख ७५ हजाराची ३५ ग्रॅमची सोन्याची मंगलपोत असा ऐवज चोरी झाला आहे. संजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.