Monday, March 24, 2025
Homeजळगावएकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठी वाढ !

एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठी वाढ !

एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठी वाढ !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – राज्यात येत्या काही दिवसात दिवाळी सण येवून ठेपला आहे तर बुधवारी एकाच दिवसात सोन्याच्या भावात एक हजार १०० रुपयांची वाढ झाली. यामुळे सोने ७७ हजार ३०० रुपये अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचले आहे. यासोबतच चांदीच्याही भावात बुधवारी एक हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ती ९२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

विजयादशमीला ६०० रुपयांची वाढ होऊन ७६ हजार ६०० रुपयांवर पोहोचलेले सोने तीन दिवस याच भावावर स्थिर राहिले. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी त्यात ४०० रुपयांची घसरण होऊन ते ७६ हजार २०० रुपयांवर आले. त्यानंतर मात्र १६ ऑक्टोबर रोजी त्यात थेट एक हजार १०० रुपयांची वाढ झाली. आता एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह ७९ हजार ६१९ रुपये मोजावे लागणार आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या