एका वृद्धाने स्वतःच्या गळ्यावर वार करत केली आत्महत्या !
रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील वाघोड येथील एका वृद्धाने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, वाघोड येथील चिंतामण फकिरा कुंभार (वय ६५) यांनी २१ रोजी पहाटे ३ ते ६ वाजेदरम्यान स्वतःच्या गळ्यावर स्वतःच्या हाताने विळ्याने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र, अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मयत घोषीत केले. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा तपास हवालदार नितीन आमोदकर करत आहेत.