Sunday, April 27, 2025
Homeगुन्हाऑनलाइन डिलिव्हरीत मोबाइल ऐवजी मिळाला चक्क 'साबण' !

ऑनलाइन डिलिव्हरीत मोबाइल ऐवजी मिळाला चक्क ‘साबण’ !

ऑनलाइन डिलिव्हरीत मोबाइल ऐवजी मिळाला चक्क ‘साबण’ !
ऑन लाईन खरेदीची फसवणूक

रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अॅमेझॉन कंपनीकडून मागवलेल्या ऑनलाईन मोबाईल ऐवजी ग्राहकाला पार्सलमधून साबण मिळाल्यानंतर तांदलवाडी येथील सुनील दशरथ पाटील यांनी नववर्षाच्या प्रारंभी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे
या गुन्ह्याची चौकशी साठी करीत निंभोरा पोलिसांनी पार्सल पोहोचणाऱ्या डिलेव्हरी बॉयला बेड्या ठोकत त्याच्याकडून 52 हजार 748 रुपये किंमतीच्या वस्तू जप्त केल्या.
संशयीताला अटक केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची अर्थात बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
. रुपेश तुकाराम पाटील (35, कडगाव, ता.जि. जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

सुनील पाटील यांनी 12 हजार 500 रुपये किंमतीचा रियल मी कंपनीचा फाईव्हजी मोबाईल नारझो एन 5 सिरीज अॅमेझॉनवर ऑर्डर केला आहे
मात्र अॅमेझॉन कंपनीच्या पार्सल विभागातील डिलिव्हरी कर्मचाऱ्याने मोबाईलच्या बॉक्समध्ये फिर्यादीस दोन संतूर साबण व तीन लहान डेटॉल साबण देऊन त्याची मोठी फसवणूक केली.
याबाबतच्या तक्रारीवरून निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती.
याबाबतीत पोलिसांनी डिलिव्हरी करणाऱ्या ने हा घपला केल्याचे शोधून काढले. आरोपी रुकेश तुकाराम पाटील (35, कडगाव, ता.जि. जळगाव) याच्याकडून मोबाईलसह एकूण 52 हजार 748 रुपये किंमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, सुरेश भीमराव अडायगे यांनी केली.
आरोपीस रावेर न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीने आणखी कुणाची फसवणूक केली आहे का ? याचा शोध पोलीस घेत आहेत.
नेमका हा प्रकार कसा घडला हे पोलीस शोधून काढतील पण या प्रकराच्या खरेदी पासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या