Tuesday, April 29, 2025
Homeगुन्हाऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात दीड हजारांची लाच स्विकारतांना अधिकाऱ्याला अटक !

ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात दीड हजारांची लाच स्विकारतांना अधिकाऱ्याला अटक !

ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात दीड हजारांची लाच स्विकारतांना अधिकाऱ्याला अटक !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात लाच घेण्याची पद्धत आज देखील सुरु असतांना नुकतेच कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात दीड हजार रूपयांची लाच स्विकारतांना धरणगाव पंचायत समितीतील सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याला जळगाव लाच लुचपत विभागाने कार्यालयात रंगेहात पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी २१ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता केली आहे. प्रविण चौधरी असे अटक केलेल्या सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तक्रारदार यांना वर्क ऑर्डर देण्यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रविण चौधरी यांनी दीड हजारांची लाच मागितली होती. यानंतर तक्रारदार यांनी यासंदर्भात जळगाव लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणीसाठी पथकाने शुक्रवारी दुपारी धरणगाव पंचायत समिती कार्यालयातच सापळा रचला. यावेळी प्रविण पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडून दीड हजार रूपये स्विकारतांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात प्रवीण दीपक चौधरी व तांत्रिक सहाय्यक उमेश किशोर पाटील यांच्यावर  गुन्हा दाखल करण्याचे करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या