Sunday, April 27, 2025
Homeगुन्हाओझरखेडा येथे चोरट्यांचा शालेय पोषण आहारावर डल्ला

ओझरखेडा येथे चोरट्यांचा शालेय पोषण आहारावर डल्ला

ओझरखेडा येथे चोरट्यांचा शालेय पोषण आहारावर डल्ला

वरणगाव प्रतिनिधी , खानदेश लाईव्ह न्युज
भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा गावातील माध्यमिक विद्यालयात शाळेच्या खोलीतून शालेय पोषण आहार चोरून नेल्याची घटना ९ डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे.

या संदर्भात शनिवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे माध्यमिक विद्यालय शाळेमध्ये असलेल्या एका खोलीत शालेय पोषण आहार ठेवण्यात आला होता.७ ते ९ डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या खोलीतून शालेय पोषण आहाराचे पिशव्या असा एकूण १५ हजार ७०० किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
ही घटना उघडकीला आल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापिका सौ अपर्णा तुकाराम पाटील यांनी वरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे.
त्यानुसार शनिवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास हेड पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद कंखरे हे करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या