ओबेनाॅल फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक छावा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याचा घेतला आनंद !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – छावा चित्रपट एक उत्कृष्ट कलाकृती आहे. उत्कृष्ट कलाकृती आणि महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना माहिती व्हावा यासाठी ओबिनाल फाउंडेशन भुसावळ यांच्या माध्यमातून दिनांक 25 फेब्रुवारी रोजी वसंत टॉकीज भुसावळ मध्ये आज चित्रपटाचे चारही शो मोफत निशुल्क चित्रपट रसिक आणि विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आले होते.

नविन पिढीला इतिहास समजावा हे उद्दीष्ठ ठेवून हा उपक्रम राबविला गेला आहे.उत्कर्ष कलाविष्कार नाट्य मंडळ भुसावळच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी च्या 25 विद्यार्थ्यांना मोफत पासेस यावेळी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ओबेनॉल फाउंडेशनच्या मार्फत विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून पाहता आला. काही विद्यार्थ्यांनी प्रथमच मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहिला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यांनी चित्रपटातील दृश्य आणि संवाद पाहून जोरदार टाळ्या वाजवून आणि घोषणा देऊन विदयार्थ्यानी आनंद व्यक्त केला. या चित्रपटातून विद्यार्थ्यांना गड, किल्ले, तोफा, युद्ध सामग्री यांची माहिती मोठ्या पडद्यावर पाहता आली.
यासाठी शाळेचे मुख्याध्यापक भगवान बडगुजर, उपशिक्षक समाधान जाधव यांनी परिश्रम घेतले .अध्यक्ष व्यवस्थापन समिती शाळा शिंदी कांचन परदेशी यांनी विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी अतिशय अल्प खर्चामध्ये त्यांची रिक्षा उपलब्ध करून दिली आणि परिश्रम घेतले.