Thursday, March 27, 2025
Homeजळगावओला दुष्काळ जाहीर करा भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मागणी

ओला दुष्काळ जाहीर करा भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मागणी

ओला दुष्काळ जाहीर करा भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मागणी!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापलेला आहे, सतत पाऊस चालू असल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. तरी शासनाने ओल दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे प्रांत यांना निवेदन देवून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की शेतामधून अक्षरशः पाणी झिरपून बाहेर पडायला लागलाय. एव्हडेच नव्हे तर येणाऱ्या कालावधीतही पावसाचे प्रमाण जास्त राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे रब्बी हंगामाचही काय होईल सांगता येणार नाही परिणामी शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल. आधीच शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या आहेत त्यात ही भर. शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून कापसाला तसेच इतर शेतमालाला हमी भाव जाहीर करावा फक्त निवडणुकांच न बघता शेतकरी जगतोय का मारतोय याचही भान शासनानं ठेवावं अन्यथा सरकार विरुद्ध रस्ता रोको आंदोलन केले जाईल असे ही निवेदनात नमूद केले आहे.

याप्रसंगी भुसावळ तालुकाध्यक्ष दिपक मराठे, युवक जिल्हाउपाध्यक्ष वाय आर पाटील, वरणगाव शहराध्यक्ष समाधान चौधरी, भुसावळ युवक कार्याध्यक्ष विशाल ठोके, मिलिंद उंबरकर , राजेश सोनवणे, विजय चौधरी, पिंपळगाव शाखाध्यक्ष राहुल मावळे, सोपान बेंडाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या