कथा वाचनामुळे स्मरणशक्ती व शब्द संग्रहात वाढ होते – डॉ.भंगाळे
यावल दि. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
कथा वाचनामुळे स्मरणशक्ती आणि शब्दसंग्रहात वाढ होते असे अध्यक्षीय भाषणात डॉक्टर भंगाळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. ते यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित यावल येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत ‘कथाकथन’ स्पर्धा संपन्न झाली.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा.प्रतिभा रावते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.की कथा वाचन करताना चढ उतार असावे लागतात.कथेतून ग्रामीण,शहरी संस्कृती रितीरिवाज आणि पद्धती ह्या अधोरेखित करून प्रांजळ मत मांडावे लागते. कथाही समाज जीवनातील आदर्शाचे स्थान म्हणून लिहिली जाते.कथेची अनेक प्रकार पडतात त्यात गुढकथा,लघुकथा हे पण प्रकार आहेत.असे म्हणत रावते यांनी राजवाडा ही कथा सांगितली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.हेमंत भंगाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाची सवय निर्माण करावी आजचा युवक वाचनापासून भरकटत चालला आहे.दररोजचे नियोजन डायरीत लिहावे,जुन्या लोकांच्या बोधकथा एकूण माहिती मिळवावी,कथेमध्ये मानवी जीवनातील दडलेले सार त्यातील
अनुभव कथेतील पात्र हे प्रसंग,व्यक्तिचित्रन दर्शवतात, निर्णय घेण्याची क्षमता ही व्यक्तिमत्व विकासाला चालना देत असते.पुस्तकातील कथा वाचून ज्ञान अवगत होते.वर्तमानपत्रात येणाऱ्या कथा विद्यार्थ्यांनी वाचायला हव्यात कथेतून व्यक्तीचे कर्तुत्व मांडलेले असते असे सांगितले.
कथाकथन स्पर्धेत कु.रोहित संजय नलवडे (T.Y.B.A) प्रथम क्रमांक तर कु. मयूर सुधाकर पाटील ( S.Y.B.A) द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.सुभाष कामडी यांनी केले.तर आभार डॉ.संतोष जाधव यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला प्रा. हेमंत पाटील,प्रा.प्रशांत मोरे, डॉ.निर्मला पवार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे,प्रमोद कदम,प्रमोद भोईटे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.