Wednesday, March 26, 2025
Homeभुसावळकरारनामानुसार बांधकाम पूर्ण करून खरेदी करून न दिल्याने भुसावळातील कॉन्ट्रॅक्टरला जिल्हा ग्राहक...

करारनामानुसार बांधकाम पूर्ण करून खरेदी करून न दिल्याने भुसावळातील कॉन्ट्रॅक्टरला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका !

करारनामानुसार बांधकाम पूर्ण करून खरेदी करून न दिल्याने भुसावळातील कॉन्ट्रॅक्टरला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मधील एका प्रख्यात बिल्डर्स डेव्हलपर्सने करारनाम्यानुसार बांधकाम करून खरेदी खत करून न दिल्याने जळगाव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने कॉन्ट्रॅक्टर तथा बिल्डरला चांगलाच दणका देऊन जामीनपात्र वॉरंट बजावून कारवाई केल्याने संपूर्ण भुसावळ विभागात बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांना करारात नमूद केलेल्या अटी शर्तीनुसार रो हाऊसचे बांधकाम पूर्ण करून त्याचा ताबा खरेदी खतासह त्वरित द्यावा तसेच कॉन्ट्रॅक्टरने तक्रारदार यांना तक्रार दाखल तारखेपासून ते खरेदी खत करून देईपर्यंत घेतलेल्या रकमेवर ९ टक्के व्याजाने तक्रारदारास रक्कम अदा करावी तसेच तक्रारदार यांना मानसिक शारीरिक व आर्थिक त्रासापोटी १० हजार व तक्रार अर्जाचे खर्चापोटी ५ हजार रुपये देण्याचा आदेश जळगाव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सदस्य तथा प्रभारी अध्यक्ष श्रीमती पुनम मलिक आणि सदस्य सुरेश जाधव यांनी दिल्याने संपूर्ण भुसावळ विभागातील कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर्स यांच्यात मोठी खळबळ उडाली आहे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जळगाव यांच्याकडील वसुली तक्रार क्र.१९७ / २०२२ यांच्याकडील जामीन पात्र वॉरंट प्रत्यक्ष बघितला असता आरोपी हसनोद्दीन शमसोद्दीन शेख राहणार भुसावल यांच्या विरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यानुसार आरोप केलेला आहे त्यानुसार आरोपी हसनोद्दीन शेख यास धरून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगा समोर दि.८ ऑक्टोबर २०२४ रोजी धरून आणावे असा हुकूम भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक यांना झाला असून आरोपीने ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर हजर होण्याविषयी १५ हजार रुपये तारण लिहून देत असतील अथवा तितक्याच रकमेचा जामीन देत असतील तर त्यास हजर राहण्याची समज देऊन सोडून द्यावे,यात कसूर करू नये असे दिलेल्या आदेशात आयोगाने नमूद केले आहे.अशा प्रकारच्या आदेशामुळे भुसावळ विभागातील बांधकाम क्षेत्रात बांधकाम करून घेणाऱ्या ग्राहकांची दिशाभूल फसवणूक करणाऱ्या काही कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांना मोठा दणका बसल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या